१० वर्षात १ कोटींचा फंड शक्य आहे!

प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपल्या बँक खात्यात करोडो रुपये असावेत असं वाटतं.

पण हे फक्त नशिबावर किंवा शेअर बाजारातील शॉर्टकट्सवर अवलंबून नाही.

तर शिस्तबद्ध आणि योग्य गुंतवणुकीने हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

गुंतवणूक सल्लागारांनी एक सोपं सूत्र सांगितलं आहे.

जर तुम्ही ३५ वर्षांचे असाल आणि १०-१२ वर्षांत १ कोटी कमवायचे असतील तर...

तुम्हाला दरमहा सुमारे ३५,००० रुपयांची SIP मध्ये १२% परताव्याने गुंतवावे लागतील.

यासाठी तुमच्या पोर्टफोलिओचे ५ भागांमध्ये विभाजन करा.

ग्रोथ फ्लेक्सिकॅप, व्हॅल्यू फ्लेक्सिकॅप, कॉन्ट्रा फंड, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप ग्रोथ फंडमध्ये प्रत्येकी २०% गुंतवणूक करा.

यामुळे जोखीम कमी होते आणि चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

दरवर्षी SIP मध्ये ५-१०% वाढ केल्यास महागाईला हरवून लवकरच तुम्ही करोडपती होऊ शकता!

टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते.

Click Here