EPFO ही सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
EPFO म्हणजे काय? नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO हा निवृत्तीनंतरचा सुरक्षित आणि विश्वासार्ह निधी व्यवस्थापन पर्याय आहे.
EPS पेन्शन मिळण्याची अट- कमीत कमी 10 वर्षे सेवा आणि वयाची 58 वर्षे पूर्ण केल्यावर कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन मिळते.
पगारातून किती रक्कम कापली जाते? कर्मचारी पगाराचा 12% EPF मध्ये जमा करतो. यातील 8.33% EPS आणि 3.67% EPF मध्ये जातात.
पेन्शनचा हिशोब दोन गोष्टींवर आधारित आहे. एक- पेंशनयोग्य वेतन (शेवटच्या 60 महिन्यांचा सरासरी पगार) आणि पेंशनयोग्य सेवा (किमान 10 वर्षे).
EPFO चा अधिकृत फॉर्म्युला- मासिक पेन्शन = (पेंशनयोग्य वेतन × पेंशनयोग्य सेवा) / 70
उदाहरण- पगार ₹15,000 आणि 10 वर्ष सेवा असेल तर: पेन्शन = ₹2,143 प्रति महिना
कर्मचाऱ्याची अंतिम 60 महिन्यांची पगार आणि सेवाकाल जितका जास्त, पेन्शन तेवढी अधिक मिळते.