जगातील ५ सर्वात श्रीमंत लोकांचे शिक्षण किती झाले?

अनेकांना वाटते श्रीमंत लोकांचे शिक्षण जास्त असते.

आज आम्ही तुम्हाला जगातील ५ सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पदव्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगणार आहोत.

ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते शिकागो विद्यापीठातून ड्रॉप आउट झाले होते आणि इलिनॉय विद्यापीठातून ड्रॉप आउट झाले होते.

एलॉन मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी १९९७ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली.

त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले, तिथे त्यांनी पीएचडी करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु दोन दिवसांनी त्यानी शाळा सोडली.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.

येथे ते संगणक विज्ञान आणि मानसशास्त्र शिकत होता, पण ते त्यांनी मध्येच सोडून दिले.

अमेझॉनचे संस्थापक बेझोस यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानाचा अभ्यास केला.

गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांनी १९९५ मध्ये मिशिगन विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीमध्ये विज्ञान पदवी मिळवली.

त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक विज्ञानात मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवली.

Click Here