भारतीय रेल्वेची एक गाडी कितीची?

तुम्ही अनेकदा भारतीये रेल्वेने प्रवास केला असेल. पण, एका गाडीची किंमत माहिती आहे का?

एका २४ डब्यांच्या सामान्य ट्रेनला ६० ते ७० कोटी रुपये लागतात.

यात प्रथम श्रेणी ते एसी कोचनुसार प्रत्येक डब्याचा खर्च वेगळा असतो.

एकट्या एसी डब्यासाठी २.५ ते ३ कोटी रुपये लागतात.

स्लीपर कोचची किंमत १.२५ कोटी रुपये आहे.

सामान्य डबा बनवायला १ कोटी रुपये खर्च येतो.

इंजिन रेल्वेचा आत्मा असून एका इंजिनची किंमत १८ ते २० कोटी रुपये असते.

वंदे भारतसारख्या प्रीमियम गाड्यांची किंमत तर याहून जास्त आहे.

वंदे भारतची एक गाडी तयार करण्यासाठी ११० ते १२० कोटी रुपये खर्च येतो.

पुढील वेळी तुम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर लक्षात ठेवा, तुम्ही कोट्यवधींच्या गाडीतून प्रवास करत आहात.