इंडिगो एअरलाइन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
इंडिगो एव्हिएशन इंडस्ट्रीतील देशातील सर्वात स्पर्धात्मक आणि आकर्षक पगार देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
पगार अनुभव, फ्लाइट अवर्स, रँक, जबाबदाऱ्या आणि ट्रेनिंगसारख्या बाबींवर ठरतो. फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन या दोघांच्या सॅलरीमध्ये मोठा फरक आहे.
फर्स्ट ऑफिसर हा कॅप्टनसोबत कॉकपिटमध्ये दुसरा पायलट म्हणून काम करतो. तो एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद, तांत्रिक प्रक्रिया आणि सुरक्षेची जबाबदारी सांभळतो.
त्याचा मासिक पगार: ₹1.5 लाख - ₹2.5 लाख अन् वार्षिक पगार: ₹18 लाख - ₹30 लाखादरम्यान असू शकतो.
तर, कॅप्टन हा विमानाचा मुख्य पायलट असतो. अनुभव आणि फ्लाइट अवर्ससह जबाबदाऱ्या वाढतात तसे पगारही वाढतो.
पायलट्सना मासिक पगार: ₹5 लाख - ₹10 लाख आणि वार्षिक पगार: ₹60 लाख - ₹1.2 कोटी पर्यंत मिळू शकतो.
इंडिगो पायलट्सना पगाराव्यतिरिक्त परफॉर्मन्स बोनस, प्रॉफिट शेअरिंग, अनलिमिटेड फ्री ट्रॅव्हल फुल हेल्थ इन्शुरन्ससारख्या सुविधा मिळतात.