रेल्वेचे मायलेज हे ती मालगाडी आहे की पॅसेंजर आणि त्यावर किती डबे आहेत, यावर अवलंबून असते.
भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनची इंधन टाकी ५,००० ते ६,००० लिटर क्षमतेची असते.
२४ डबे असलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला १ किलोमीटर अंतर कापण्यासाठी साधारणपणे ६ लिटर डिझेल लागते.
मालगाडीवर लोड जास्त असल्याने, ती १ किलोमीटर जाण्यासाठी साधारण ९ ते १० लिटर डिझेल खर्च करते.
१२ डबे असलेली पॅसेंजर ट्रेन १ किलोमीटरसाठी साधारण ४.५ ते ५ लिटर डिझेल वापरते.
रेल्वेचे इंजिन एकदा बंद केल्यास ते पुन्हा सुरू करण्यासाठी सुमारे २०-२५ लिटर डिझेल खर्च होते, म्हणून ते अनेकदा चालू ठेवले जाते.
इंजिन बंद केल्यास ब्रेक मारण्यासाठी लागणारा एअर प्रेशर कमी होतो, जो पुन्हा तयार होण्यास वेळ लागतो.
रेल्वे सुरू करताना सर्वाधिक इंधन खर्च होते, एकदा वेग घेतल्यावर इंधनाचा वापर स्थिर होतो.
वाढता खर्च आणि प्रदूषण रोखण्यासाठी भारतीय रेल्वे आता वेगाने विद्युतीकरणाकडे वळत आहे.