धनत्रयोदशी स्पेशल : सोने खरेदीचे ५ स्मार्ट मार्ग!

धनतेरसच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत मंगल मानले जाते. 

आता फक्त पारंपरिक दागिन्यांवर अवलंबून न राहता, सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी सोन्याचे हे ५ आधुनिक मार्ग जाणून घ्या.

फिजिकल गोल्ड: यात सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करा. 

शुद्धतेसाठी बीआयएस हॉलमार्क असणे अनिवार्य आहे. मेकिंग चार्ज कमी करण्यासाठी नाणी किंवा साधे डिझाइन निवडा.

डिजिटल गोल्ड: कमी रकमेत सोने खरेदी करण्याचा हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. जोपर्यंत विक्री करत नाही, तोपर्यंत तुमचे सोने प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवले जाते.

गोल्ड ETF : हे फंड थेट भौतिक सोन्यात गुंतवणूक करतात. डिमॅट खात्याद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर शेअर्सप्रमाणे याची खरेदी-विक्री करता येते.

गोल्ड म्युच्युअल फंड: हे फंड गोल्ड ईटीएफच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करतात. 

एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणुकीद्वारे तुम्ही सोन्याशी जोडले जाता. नवीन गुंतवणूकदारांसाठी हा सोपा मार्ग आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेल्या या सरकारी रोख्यांना ९९९ शुद्ध सोन्याचे समर्थन असते. 

यात ८ वर्षांची मॅच्युरिटी असून ५ वर्षांनंतर रिडीम करण्याचा पर्याय मिळतो.

Click Here