केंद्र सरकारने जीएसटीत केलेल्या बदलामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे
२२ सप्टेंबरपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार, कारण आता जीएसटी अंतर्गत फक्त ५% आणि १८% असे २ कर स्लॅब असतील
या मोठ्या बदलामुळे खाण्यापासून ते कार आणि बाईकपर्यंत सर्व काही स्वस्त होईल. यासोबतच कपडे, शूज यांच्या किमतीत मोठी कपात होईल
GST कौन्सिलच्या बैठकीत सिंथेटिक धागा, न विणलेले कापड, शिवणकामाचा धागा, स्टेपल फायबरवरील जीएसटी दर ५% पर्यंत कमी झाला आहे
रेडीमेड किंवा इतर कपडे जसे की शर्ट, टी-शर्ट, जीन्स, ज्यांची किंमत ₹२,५०० पेक्षा जास्त नाही, यावरही ५% GST आकारला जाईल
याचा अर्थ असा की जर तुम्ही २००० रुपयांचा शर्ट, टी-शर्ट किंवा जीन्स कपडे खरेदी केले तर त्याची किंमत १४० रुपयांनी कमी होईल
१५,००० रुपयांच्या शूजवर याआधी २८% जीएसटी आकारला जात होता, जो आता १८% श्रेणीत येईल, म्हणजेच यावरील किंमतही कमी होणार आहे
समजा, २५०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ब्रँडेड कंपन्यांचे शूज आणि कपडे खरेदी केले, एकूण खर्च १०,००० झाला तर त्यावर ५% GST आकारला जाईल