भारतात अनेक वर्षांपासून वर्क लाइफ बॅलन्सबाबत चर्चा सुरू आहेत.
पण, जगात सर्वात चांगले कामगार कायदे कोणत्या देशात आहेत? हे माहिती आहे का?
२०२५ मध्ये कामाचा ताण आणि संतुलित जीवनामध्ये न्यूझीलंड जगात नंबर १ आहे.
डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये आठवड्यात कामाचे सरासरी तास फक्त ३४ ते ३७ आहेत.
नॉर्वेमध्ये कर्मचाऱ्यांना तब्बल ४९ आठवड्यांची पगारी पॅरेंटल लीव्ह मिळते.
स्वीडन आणि जर्मनीसारखी राष्ट्रे कामगारांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देतात.
महाराष्ट्र सरकारने नुकतेच फॅक्टरीज ॲक्टमध्ये कामाचे तास ९ वरून १२ पर्यंत वाढवले आहेत.
याचा थेट परिणाम कामगारांच्या आरोग्यावर आणि कामाच्या ताणावर होण्याची शक्यता आहे.
जिथे जग कमी कामाच्या तासांकडे जात आहे, तिथे महाराष्ट्रातील हे बदल चिंता निर्माण करणारे आहेत.