सध्याची टोल संकलन प्रणाली एका वर्षात टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल
सध्याची टोल संकलन प्रणाली एका वर्षात टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल आणि त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक प्रणाली आणली जाणार आहे.
यामुळे महामार्गावरील प्रवाशांना कोणत्याही थांब्याविना किंवा बाधेविना सुरळीत प्रवास करता येईल, असं केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं.
ही नवीन प्रणाली १० ठिकाणी सुरू करण्यात आली आहे आणि एका वर्षाच्या आत देशभरात तिचा विस्तार केला जाईल.
एनपीसीआय भारतातील महामार्गांवरटोल संकलन सुलभ व्हावं या दृष्टीने एनईटीसीनं कार्यक्रम विकसित केला आहे. इलेक्ट्रॉनिक टोलपेमेंटसाठी हा एक एकीकृत प्लॅटफॉर्म आहे.
दिल्लीतील प्रदूषण लक्षात घेता आता सरकार पर्यायी इंधनांना प्राधान्य देत असल्याचे सांगून आपण स्वत: टोयोटा ‘मिराई’ हायड्रोजन इंधन कारचा वापर सुरू केला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे ते म्हणाले. मिराई हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ भविष्य असा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?