दिवाळीत EMI वर नवीन फोन घ्यावा की म्युच्युअल फंडात SIP करावी? कुठे होईल जास्त फायदा?
सणासुदीत नो-कॉस्ट EMI आणि मोठ्या सवलती आपल्याला आकर्षित करतात.
लक्षात ठेवा EMI म्हणजे कर्ज. तुम्ही आज वस्तू घेता आणि त्यावर दोनतीन वर्षे व्याज भरता.
तर SIP म्हणजे गुंतवणूक. तुम्ही आत्ता गुंतवणूक केली तर भविष्यात नफ्यासोबत महागडा फोनही कॅशवर घेऊ शकता.
उदाहरणार्थ: ५ लाखांची वस्तू EMI वर घेतल्यास, ५ वर्षांत ₹६.६७ लाख भरावे लागतील (₹१.६७ लाख जास्त).
तीच ५ लाखांची वस्तू SIP करून घेतल्यास, तुम्ही ₹४.६४ लाख गुंतवून ५ वर्षांत ₹६.३८ लाख मिळवू शकता.
म्हणजेच, EMI मध्ये तुम्हाला ₹१.६७ लाख 'द्यावे' लागतील, तर SIP मध्ये ₹१.७४ लाख 'मिळतील'.
EMI तुम्हाला त्वरित समाधान देते, पण आर्थिक बोजा वाढवते आणि कर्जाच्या जाळ्यात ओढू शकते.
SIP तुम्हाला आर्थिक शिस्त शिकवते, बचत वाढवते आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता देते.
गरजा आणि जबाबदाऱ्या ओळखा, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका; 'आजचा आनंद' की 'भविष्यातील आर्थिक स्थैर्य'? याचा विचार करा.