चेक बाऊन्स झाल्यास अनेकांना सिबिल स्कोअरची चिंता वाटते. पण, खरच असे होते का?
बहुतेक प्रकरणांमध्ये, चेक बाऊन्स झाल्याने सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होत नाही. पण 'कधी' आणि 'कशासाठी' हा फरक महत्त्वाचा आहे.
जर तुम्ही फक्त एखाद्या व्यवहारासाठी (उदा. खरेदीसाठी) चेक दिला असेल आणि तो बाऊन्स झाला, तर त्याची माहिती क्रेडिट ब्युरोला दिली जात नाही.
जर चेक EMI किंवा क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी होता आणि तो बाऊन्स झाला, तर मात्र थेट परिणाम होतो.
बँक EMI आणि क्रेडिट कार्ड पेमेंटची माहिती थेट क्रेडिट ब्युरोला कळवते. त्यामुळे, पेमेंट चुकल्यास तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो.
वारंवार चेक बाऊन्स झाल्यास बँक तुम्हाला 'गैर-जबाबदार' ग्राहक मानू शकते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कर्ज मिळणे कठीण होते.
जर चेक बाऊन्सचे प्रकरण कोर्टात गेले आणि तुमच्या आर्थिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, तर त्याचा मोठा परिणाम होतो.
सर्वात आधी, तुमच्या खात्यात नेहमी पुरेसे पैसे ठेवा, जेणेकरून चेक बाऊन्स होणार नाही.
जर चेकने कोणतेही बिल किंवा EMI भरायचे असल्यास, वेळेवर तुमच्या खात्यात पैसे जमा करा.
ही शिस्त तुम्हाला केवळ चेक बाऊन्सपासून वाचवणार नाही, तर बँकसोबतचे तुमचे आर्थिक संबंधही चांगले ठेवेल.