ATM कार्ड विसरा! आता UPI ने काढा रोख रक्कम!

घाईत ATM कार्ड घरी विसरलात? आता चिंता करू नका! कारण, देशभरातील बँकांनी 'UPI कार्डलेस कॅश विथड्रॉवल' (ICCW) सुविधा सुरू केली आहे.

Google Pay, PhonePe किंवा BHIM App वापरून तुम्ही थेट एटीएममधून रोख रक्कम काढू शकता.

ही सुविधा खूप सोपी, जलद आणि १००% सुरक्षित आहे, कारण यामध्ये कार्ड स्वाईप करण्याची गरज नाही.

कार्ड क्लोनिंग किंवा चोरी यांसारख्या धोक्यांपासून यामुळे पूर्णपणे मुक्ती मिळते.

एटीएम स्क्रीनवर 'UPI Cash Withdrawal' हा पर्याय निवडावा लागतो.

इथे तुम्हाला १०० ते १०,००० रुपयांपर्यंतची रक्कम टाकावी लागते, ज्यामुळे एटीएमवर एक QR कोड तयार होतो.

हा QR कोड तुम्ही तुमच्या UPI App (उदा. PhonePe) ने स्कॅन करा.

App मध्ये UPI PIN टाकून ट्रान्झॅक्शन कन्फर्म करताच, एटीएममधून लगेच पैसे बाहेर येईल.

सध्या तुम्ही एका ट्रान्झॅक्शनमध्ये जास्तीत जास्त १०,००० रुपये काढू शकता.

ही सुविधा फक्त ICCW सक्षम असलेल्या एटीएमवरच उपलब्ध आहे. आता फक्त मोबाइल घेऊन बाहेर पडा आणि बिंधास्त रोख काढा!

Click Here