बाजारात मिळणारी १८० रुपयांची बियर बनते ३० रुपयांत

बाजारात मिळणारी बियर तयार करण्यासाठी कमी खर्च येतो.

बाजारात सहजपणे मिळणारी १८० रुपयांची एक बियर प्रत्यक्षात कारखान्यात अवघ्या २५ ते ३० रुपयांमध्ये तयार केली जाते.

श्रावण मासांत मांसाहार आणि मद्यपानास बंदी असते. त्यामुळे श्रावणाआधी येणारी ही आषाढ अमावस्या याला गटारी म्हणतात हिची अनेक तळीराम वाट बघत असतात कारण याच दिवशी छप्परफ़ाड मद्य विक्री होते. 

पण तुम्ही १८० रुपयांना विकत घेत असलेली मद्य किंवा बियर केवळ ३० रुपयात बनते हे तुम्हाला माहित आहे का?

बियरच्या वाहतूक आणि पॅकेजिंगचा खर्च दहा रुपये येतो.

कंपनीचा नफा १५ रुपये आहे.

बियरच्या एका बाटलीचा उत्पादन खर्च ३० रुपये आहे.

बियरच्या एका बाटलीवर ३० रुपये व्हॅट लावला जातो.

एका बियरच्या बाटलीवर उत्पादन कर ७० रुपये आहे.

या सर्व खर्चानंतर एका बियरच्या बाटलीची बाजारमूल्य १८० रुपये आहे.

Click Here