पीएफमधून आता नेमके किती पैसे काढता येतात? ७५ की १०० टक्के?
पीएफमधून पैसे काढण्याचे नियम परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत.
पीएफमधून पैसे काढण्याचे नियम परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत. जर एखाद्याची नोकरी गेली. तो बेरोजगार झाला, तर त्याला पीएफ शिल्लक रकमेपैकी ७५% रक्कम तात्काळ काढण्याची परवानगी मिळते.
उरलेली २५% रक्कम तो एक वर्षानंतर काढू शकतो. बेरोजगारी, अपंगत्व, काम करण्यास असमर्थता, नोकरीवरून कमी करणे, स्वेच्छानिवृत्ती किंवा कायमस्वरूपी परदेशात जाणे अशा परिस्थितीत १००% रक्कम काढता येते.
५५ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर, देखील संपूर्ण पीएफ शिल्लक काढण्याची मुभा आहे. परंतु अनेकदा लोकांनी वारंवार पैसे काढल्याने निवृत्तीच्या वेळी त्यांच्याकडे फारच कमी शिल्लक उरते.
७५% सदस्यांकडे अंतिम सेटलमेंटवेळी केवळ ५०,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम होती आणि निम्म्या सदस्यांकडे तर फक्त २०,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम होती. यामुळे त्यांना ८.२५% कंपाउंडिंगचा पूर्ण फायदा मिळत नाही.
म्हणूनच, कामगारांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळावी, निवृत्तीवेळी चांगला निधी तयार व्हावा, यासाठी नवीन नियम लागू केला गेला आहे.
यानुसार किमान २५% रक्कम पीएफ खात्यात ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजे, गरजेच्या वेळी पैसे काढण्याची सुविधा आहेच, पण त्याचवेळीनिवृत्तीच्या काळात आर्थिक आधार मिळावा याची हमीही दिली जाते.
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम