६ सरकारी कंपन्यांनी Q4 निकालांसह केली लाभांशाची घोषणा, तुमच्याकडे आहे यापैकी कोणता स्टॉक?

आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर अनेक सरकारी कंपन्यांनी आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला. कोणती कंपनी किती लाभांश देणार आहे, जाणून घेऊ.

एसबीआयनं आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर १७.३५ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १६ मे ही 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित केली आहे. शुक्रवारी या बँकेच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

इंडियन बँक - इंडियन बँकेनं २९ एप्रिल रोजी प्रति शेअर १८.२५ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली होती. गेल्या ५ वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना ६६७ टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. 

चेन्नई पेट्रोलियम - या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं मोठा लाभांश जाहीर केलाय. कंपनीनं ५४०% लाभांश देण्याचं ठरवलं असून, पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर ५४ रुपयांचा फायदा होणार आहे. 

कोल इंडिया - कोल इंडियानं १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर ५.२५ रुपये लाभांश जाहीर केलाय. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये २ टक्क्यांची घसरण होऊन तो ४५६.३५ रुपयांवर बंद झाला.

भेल लिमिटेड - भेल कंपनीकडून २ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरवर १.४० रुपये अंतिम लाभांश दिला जाणार आहे. एजीएम झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ही रक्कम गुंतवणूकदारांना दिली जाईल.

माझगांव डॉक - कंपनीनं ३० एप्रिल रोजी झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये प्रति शेअर ४.६२ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. गेल्या ५ वर्षांत मझगांव डॉकच्या शेअरमध्ये २४५१ टक्के इतकी वाढ झाली.

टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Click Here