२४ कॅरेटनंतर आता २२ कॅरेट सोनंही लाखांच्या पार, काय आहेत नवे दर?
सोन्या चांदीच्या दरात आता मोठी वाढ झाली असून त्याचे दर आता अवाक्याबाहेर जाताना दिसताहेत.
आज पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोनं ५०१ रुपयांनी महाग झालं असून ते १०६४४६ रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकावरपोहोचलंय.
गेल्या ५ दिवसांत म्हणजेच या सप्टेंबरमध्ये, सोनं प्रति १० ग्रॅम ४०५८ रुपयांनीमहागलं. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो ७७३१ रुपयांनी वाढ झाली आहे.
आयबीजेएच्यादरांनुसार, आज सोनं १०६४४६ रुपये आणि चांदी १२३५८१ रुपयांवर उघडली. जीएसटीसह सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो १२७२८८ रुपये झाला आहे.
तर, सोनं प्रति १० ग्रॅम १०९६३९ रुपयेझालंय. आयबीजेएनुसार, गुरुवारी, जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो १२३२०७ रुपये झाला. तर, सोनं प्रति १० ग्रॅम १०५९४५ रुपये होता.
आज २३ कॅरेट सोन्याचा भावही ४९९ रुपयांनी वाढून १०६०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता १०९२०० रुपये झाली.
२२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९ रुपयांनी वाढून ९७५९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह तो १००४३० रुपयांवर पोहोचलाय.
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३७६ रुपयांनी वाढून ७९८३८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे आणि जीएसटीसह तो ८२२३० रुपये प्रति १० ग्रॅमझालाय.
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चागॅरेंटिडरिटर्न, पाहा संपूर्ण गणित