Join us  

₹४५०० पार जाऊ शकतो TATA चा 'हा' शेअर, रेखा झुनझुनवालांकडे आहेत ४ कोटी शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 1:32 PM

टाटा समूहाच्या या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टायटनचे शेअर्स सोमवारी कामकाजारम्यान 3750.60 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

टाटा समूहाची कंपनी टायटनच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टायटनचे शेअर्स सोमवारी कामकाजारम्यान 3750.60 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. टायटनचे शेअर 4500 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात, असं बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. टायटनच्या शेअर्समध्ये आणखी 22% ची वाढ दिसू शकते, असा अंदाज तज्ज्ञानी व्यक्त केलाय. टायटनच्या त्रैमासिक बिझनेस अपडेटनंतर मार्केट तज्ज्ञांनी एका नोटमध्ये यासंदर्भातील माहिती दिलीये. दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांनीही टायटनच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 

काय म्हटलंय ब्रोकरेजनं? 

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने एका नोटमध्ये म्हटलंय की टायटनचे शेअर्स 4500 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. सीएलएसएनं टायटनच्या शेअर्ससाठी 4574 रुपयांची टार्गेट प्राईज दिली आहे. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स सध्याच्या शेअरच्या किमतीच्या तुलनेत 22% नी वाढू शकतात. टायटननं मार्च 2024 तिमाहीच्या बिझनेस अपडेटमध्ये, जानेवारी-मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर त्यांच्या स्वतंत्र महसूलात 17% वाढ झाल्याचं म्हटलंय. देशांतर्गत दागिन्यांच्या ऑपरेशनमध्ये 19 टक्के वाढ झाली असल्याचं त्यांनी नमूद केलंय. 

रेखा झुनझुनवालांकडे 4 कोटींपेक्षा अधिक शेअर्स 

दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला यांचा टायटनमध्ये मोठा हिस्सा आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 47695970 शेअर्स किंवा कंपनीतील 5.37% हिस्सा आहे. गेल्या 5 वर्षांत टायटनच्या शेअर्समध्ये 243% ची मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 1096.10 रुपयांवरून 3700 रुपयांपर्यंत वाढलेत. त्याच वेळी, गेल्या 10 वर्षांत टायटनचे शेअर्स 1357% ने वाधारले आहेत. या कालावधीत टायटनचे शेअर्स 257.10 रुपयांवरून 3750.60 रुपयांपर्यंत वाढलेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 3885 रुपये आहे. त्याच वेळी, टायटनच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2559.30 रुपये आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटागुंतवणूक