Join us  

मुकेश अंबानी खरेदी करणार Paytm? रॉकेट बनले जिओ फायनान्शिअलचे शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:37 PM

आज कंपनीच्या शेअरने 15 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवून विक्रमी पातळी गाठली.

Reliance and Paytm News : गेल्या काही काळापासून पेमेंट आणि यूपीआय अॅप Paytm अडचत आले आहे. अलीकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने Paytm पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. अशातच रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पेटीएमचा व्यवसाय विकत घेण्याच्या विचारात आहेत. ही बातमी पसरताच मुकेश अंबानींची NBFC कंपनी Jio Financial चे शेअर्स रॉकेट झाले आहेत. आज कंपनीचे शेअर 15 टक्क्यांहून अधिक वाढून विक्रमी पातळीवर पोहोचले. 

या प्रकरणाची माहिती असलेल्या फिनटेक आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, वन 97 कम्युनिकेशन्स(Paytm ची मालकी कंपनी) आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी जिओ फायनान्शियल आणि HDFC बँकेशी बोलणी करत आहे. रिपोर्टनुसार, गेल्या नोव्हेंबरपासून विजय शेखर शर्मा यांची टीम जिओ फायनान्शिअलशी बोलणी करत होती. तर, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेशीही चर्चा सुरू झाली. 

जिओ फायनान्शिअल शेअर्स 14 टक्क्यांनी वाढलेबीएसईच्या आकडेवारीनुसार, जिओ फायनान्शियलचे शेअर्स रॉकेटप्रमाणे चढले आहेत. कंपनीचे शेअर्स दुपारी 2.30 वाजता 15 टक्क्यांच्या वाढीसह 294 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 253.75 रुपयांवर बंद झाले होते. म्हणजे, सध्या या शेअरमध्ये 40 रुपयांहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1.83 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

Paytm संकटातRBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ग्राहकांच्या खात्यात ठेव किंवा क्रेडिट स्वीकारण्यास बंदी घातल्यानंतर पेटीएम संकटात सापडले आहे. कथित मनी लाँड्रिंग आणि KYC उल्लंघनामुळे पेटीएमचा बँकिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत आहे. या युनिटचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी होत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएमचे शेअर्स अवघ्या 3 दिवसांत 42 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

(टीप- शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :जिओपे-टीएममुकेश अंबानीव्यवसायगुंतवणूक