Join us  

टाटा ग्रुपची आणखी एक मोठी डील, 835 कोटींमध्ये या कंपनीत खरेदी केला 10% हिस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 6:00 PM

Tata Sky and Temasek: या करारानंतर टाटा ग्रुपची हिस्सेदारी 70% पर्यंत वाढली आहे.

Tata Play News : टाटा ग्रुपमधील टाटा सन्सने ग्रुपच्याच आणखी एका कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. टाटा सन्सने सिंगापूरची गुंतवणूक कंपनी टेमासेक (Temasek) कडून 10% शेअर्स खरेदी करुन टाटा प्लेमधील आपला हिस्सा वाढवला आहे. या करारानंतर टाटा प्लेमध्ये टाटा समूहाचा हिस्सा 70% झालाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा करार सुमारे 100 मिलियन डॉलर्स (835 कोटी रुपये) मध्ये झाला आहे. 

आयटी मंत्रालयाला या बदलाची माहिती दिलीरिपोर्ट्सनुसार, टाटा प्लेने नियमानुसार या बदलाशी संबंधित माहिती आयटी मंत्रालयाला दिली आहे. दरम्यान, टाटा प्ले हा टाटा ग्रुपच्या मनोरंजन क्षेत्रातील एकमेव व्यवसाय आहे, जो थेट ग्राहकांशी जोडलेला आहे. हा व्यवसाय अंदाजे 1 अब्ज डॉलर्स एवढा आहे. ही देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी असून, कंपनीचे 21 मिलियन ग्राहक आहेत. या करारानंतर टाटा प्लेमध्ये टाटा समूहाची हिस्सेदारी आता 70% आणि वॉल्ट डिस्नेची 30% पर्यंत वाढली आहे.

डिस्नेला टाटा प्लेमध्ये 20% स्टेक टाटा डिस्नेसोबत आपले स्टेक विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. डीटीएच व्यवसाय डिस्नेच्या मुख्य व्यवसायापेक्षा वेगळा आहे, म्हणून ते त्यातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. देशातील 21st Century Fox चा व्यवसाय विकत घेतल्यानंतर डिस्नेला टाटा प्लेमध्ये 20% हिस्सा मिळाला. डिस्नेने आपला स्टार इंडिया व्यवसाय रिलायन्सच्या Viacom18 मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर ती 8.5 अब्ज डॉलरची मोठी मीडिया कंपनी बनेल. 

टॅग्स :टाटाव्यवसायगुंतवणूक