Join us  

कॉर्पोरेट एफडीत फायदा की तोटा? नेमकं जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 7:28 AM

कॉर्पोरेट एफडीमध्ये नियमित एफडीच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो.

कॉर्पोरेट एफडीमध्ये नियमित एफडीच्या तुलनेत अधिक परतावा मिळतो. मात्र, यात जोखीमही अधिक असते. अधिक व्याजासह इतरही काही लाभ कॉर्पोरेट एफडीवर मिळतात. मात्र, विमा संरक्षण नसल्यामुळे ही गुंतवणूक जोखमीची असते.

कॉर्पोरेट एफडीद्वारे वित्तीय कंपन्या निधी उभा करतात. यात गुंतवणूक केलेली ५ लाखांपर्यंतची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशननुसार संरक्षित नसते. ही या गुंतवणुकीतील सर्वांत मोठी उणीव आहे. यात धोका असा असतो की, कंपनीचे दिवाळे निघाल्यास गुंतवणूकदाराचे पैसे बुडू शकतात. अशा प्रकारे कॉर्पोरेट एफडीमधील गुंतवणुकीत जोखीम अधिक प्रमाणात आहे.

एफडी घेण्यापूर्वी या बाबी तपासा- एएए आणि एए क्रेडिट रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडीमध्येच गुंतवणूक करा.- गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे १० ते २० वर्षांचे रेकॉर्ड पाहा.- नफा कमावणाऱ्या कंपनीतच गुंतवणूक करा.- व्याजदर आणि जोखीम तपासून घ्या.- अवास्तव व्याजाचा दावा करणाऱ्या कंपन्यांपासून दूर राहा.

कॉर्पोरेट एफडीचे ३ मोठे लाभअधिक व्याज कॉर्पोरेट एफडीमध्ये नियमित एफडीच्या तुलनेत व्याज २ ते ३ टक्के अधिक व्याज मिळते. नियमित एफडीवर ६ टक्के व्याज मिळते, कॉर्पोरेट एफडीवर मात्र ९ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.

सुलभ कर्जकॉर्पोरेट एफडीवर परिपक्वता रक्कमेच्या ७५ टक्क्यांपर्यंत सुलभ कर्ज मिळते. मुदतीपूर्वी पैसे काढल्यास लागणारा दंडही अत्यल्प असताे.व्याजाची परतफेड गुंतवणूकदारांना कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक हप्त्याचा पर्याय उपलब्ध आहे.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र