Join us

Isha & Akash Ambani Networth : मुकेश अंबानींची जुळी मुले; 33 वर्षांचे झाले ईशा आणि आकाश, किती आहे त्यांची संपत्ती? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:19 IST

Isha & Akash Ambani Networth : उद्योगपती मुकेश अंबानी यांची जुळी मुले, आकाश आणि ईशा आज आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Isha & Akash Ambani Networth : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची जुळी मुले, आकाश आणि ईशा आज आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहेत. ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटेल व्यवसाय सांभाळतात, तर आकाश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ व्यवसाय हाताळता. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला या दोघांची एकूण संपत्ती किती ते सांगणार आहोत.

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा जुळे भाऊ-बहिणी आहेत. दोघांचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. आज आकाश आणि ईशा अंबानी दोघेही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ईशा अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटेल व्यवसाय सांभाळत आहे. तर, आकाश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिलायन्स जिओ व्यवसाय पाहतात. आज आम्ही तुम्हाला या दोघांची एकूण संपत्ती सांगणार आहोत.

ईशा अंबानी नेट वर्थ33 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदावर आहेत. ईशा अंबानीने रिलायन्स रिटेलचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. ईशा अंबानीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, ती सूमारे 800 कोटी रुपये आहे. हुरुन श्रीमंतांच्या यादीत ईशा अंबानी 31 व्या स्थानावर आहे. 2018 मध्ये ईशा अंबानीने आनंद पिरामलसोबत लग्न केले.

आकाश अंबानी नेट वर्थमुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओचा व्यवसाय सांभाळत आहे. 27 जून 2022 रोजी आकाश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, त्यानंतर त्यांनी कंपनीला खूप पुढे नेले. त्यांची एकूण संपत्ती 3300 कोटी रुपये आहे. हुरुन इंडिया अंडर-35 यादीत आकाश अंबानी 32 व्या स्थानावर आहे. आकाश अंबानी रिलायन्स जिओमध्ये त्यांच्या नेतृत्वात 5G आणि AI तंत्रज्ञान खूप पुढे नेले आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीआकाश अंबानीईशा अंबानीगुंतवणूक