Join us

४० व्या वर्षीही केलं 'हे' काम तर ६० पर्यंत बँकेत असेल कोट्यवधींचा बॅलन्स; महिन्याला मिळेल ₹८०,००० पेक्षा अधिक पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:56 IST

Pension Investment Tips: जर तुमचं वय ४० वर्षे असेल आणि त्यांनी अद्याप निवृत्तीचे नियोजन सुरू केलं नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्य सुरक्षित ठेवू शकता.

Pension Investment Tips: जर तुमचं वय ४० वर्षे असेल आणि त्यांनी अद्याप निवृत्तीचे नियोजन सुरू केलं नसेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्य सुरक्षित ठेवू शकता. ही योजना तुमच्यासाठी एकरकमी निवृत्ती निधी तसंच पेन्शनची व्यवस्था करेल. वयाच्या ६० व्या वर्षी बँक खात्यात किमान ८०,००० रुपये पेन्शन आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक मिळवण्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल? जाणून घेऊ.

जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षापासून एनपीएसमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करत असाल आणि १ कोटीपेक्षा जास्त निधी आणि ८०,००० रुपये पेन्शन मिळवू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला खास रणनीती अवलंबावी लागेल. तुम्हाला महिन्याला २०,००० रुपयांपासून एनपीएसच्या माध्यमातून बॅलन्स्ड लाइफसायकल फंडात गुंतवणूक सुरू करावी लागेल आणि दरवर्षी १०% टॉप-अप करावं लागेल. अशा प्रकारे सलग २० वर्षे गुंतवणूक सुरू ठेवावी. अशा प्रकारे तुम्ही २० वर्षात एकूण १,३७,४६,००० रुपयांची गुंतवणूक कराल.

निवृत्तीनंतर किती रक्कम मिळेल?

त्यात १० टक्के परतावा मिळाल्यास तुम्हाला १,७०,८६,४४६ रुपये व्याज म्हणून मिळतील. यामध्ये गुंतवलेली रक्कम आणि व्याज जोडलं तर १,३७,४६,०००+ १,७०,८६,४४८ = ३,०८,३२,४४८ रुपये जमतील. जर तुम्ही या रकमेच्या ६० टक्के रक्कम रिटायरमेंट फंड म्हणून घेतली तर तुम्हाला १,८४,९९,४६९ रुपये रिटायरमेंट फंड म्हणून मिळतील. या रकमेच्या ४० टक्के म्हणजेच १,२३,३२,९७९ रुपये तुम्हाला अॅन्युइटीमध्ये गुंतवावे लागतील. यातूनच तुम्हाला पेन्शन मिळेल.

किती पेन्शन मिळेल?

जर तुम्ही ४० टक्के रक्कम म्हणजे १,२३,३२,९७९ रुपये अॅन्युइटीमध्ये गुंतवले असतील आणि त्यावर ८ टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला दरमहा ८२,२२० रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

बॅलन्स्ड लाइफसायकल फंड (बीएलसी) इक्विटी, कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी बाँड्स अशा तीन प्रमुख श्रेणींमध्ये गुंतवणूक करतो. वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत बीएलसीमधील ५० टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये ठेवली जाते. यानंतर ग्राहकाचे वय जसजसं वाढत जातं तसतसे इक्विटीमधील गुंतवणूक हळूहळू कमी होत जाते. वयाच्या ५५ व्या वर्षी इक्विटी एक्सपोजर ३५ टक्क्यांपर्यंत खाली येते आणि सरकारी बाँड्ससारख्या सुरक्षित पर्यायांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूक