Join us  

संधीचे सोने; Paytm मधून नोकरी गेली, 'या' कर्मचाऱ्यांनी उभारल्या 10000 कोटींच्या कंपन्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 3:29 PM

गेल्या काही दिवसांपासून पेटीएम अडचणीत आले आहे. यामुळे कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Paytm News: गेल्या काही दिवसांपासून Paytm अडचणीत आले असून, यामुळे कंपनीतील अनेकांना आपली नोकरी गमवावी लागत आहे. काही कर्मचाऱ्यांसाठी हा संकटाचा काळ असू शकतो, पण असेही काही कर्मचारी आहेत, ज्यांनी या संधीचं सोनं करुन दाखवले. पेटीएमचे असे अनेक माजी कर्मचारी आहेत, ज्यांनी गेल्या काही आपला यशस्वी व्यवसाय उभारला. आज ते 22 हून अधिक यशस्वी स्टार्टअपचे मालक आहेत. तर, त्यांच्या कंपनीचे एकूण मूल्य 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

पेटीएममधून नोकरी गमावल्यानंतर काही माजी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी करुन दाखवला. यामध्ये, पॉकेट एफएम, पार्क+, इंडिया गोल्ड, ज्युनियो, क्लिअरडेक, जेनेवाइज क्लब, योहो आणि दलचिनी या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांचे मालक कधीकाळी पेटीएममध्ये काम करायचे. 

कोण आहेत 'या' कंपन्यांचे मालक?मीडिया रिपोर्टनुसार, पॉकेट एफएमचे संस्थापक रोहन नायक आहेत, जे एकेकाळी पेटीएमचे प्रोडक्ट मॅनेजर होते. याशिवाय, गृहनिर्माण सोसायट्या आणि मॉल्समध्ये पार्किंग मॅनेज करणारे अमित लखोटिया एकेकाळी पेटीएम वॉलेटचे बिझनेस हेड होते. तसेच, इंडिया गोल्डचे संस्थापक दीपक ॲबॉट पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष, तर सह-संस्थापक नितीन मिश्रा हे पेटीएम पोस्टपेडचे व्यवसाय प्रमुख होते.

या कंपन्याही चर्चेतपीटीएमच्या इतर अनेक माजी कर्मचाऱ्यांनीही अनोख्या कंपन्या सुरू केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल पॉकेटमनी प्लॅटफॉर्म बनवणारा Junio, ऑडिओ डेटिंग प्लॅटफॉर्म Frn, आय वेअर ब्रँड Clear Dekh, वृद्धांसाठीचा ऑनलाइन क्लब 'Genwise Club', फुटवेअर ब्रँड योहो, व्हेंडिंग मशीन स्टार्टअप Cinnamon आणि सायबर सुरक्षा कंपनी क्रिटिकल टेक यांचा समावेश आहे.

नोकरी करणारे, नोकरी देणारे बनले...पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा म्हणतात की, लोकांनी नोकरी करणारा नाही, तर नोकरी देणारा बनले पाहिजे. या सर्व स्टार्टअपच्या संस्थापकांनी हेच खरे करुन दाखवले. या 22 स्टार्टअप्सचे एकूण मूल्य 10,668 कोटी रुपये आहे, तर त्यांच्याकडे 2,500 हून अधिक कर्मचारी काम करतात. यातील टॉप कंपन्यांमध्ये पॉकेट एफएम, पार्क+ आणि इंडिया गोल्ड आहेत.

टॅग्स :पे-टीएमव्यवसायगुंतवणूक