Join us

युआनचा इफेक्ट आटोक्यात!

By admin | Updated: August 28, 2015 03:22 IST

जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला मंदीचे ग्रहण लागल्याच्या पार्श्वभूमीवर सावरण्यासाठी चीनने केलेल्या त्यांच्या चलनाच्या अवमूल्यनाचे पडसाद जगभरातील शेअर

मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला मंदीचे ग्रहण लागल्याच्या पार्श्वभूमीवर सावरण्यासाठी चीनने केलेल्या त्यांच्या चलनाच्या अवमूल्यनाचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांवर उमटले आणि भारतात तर शेअर बाजाराच्या एकदिवसीय कामगिरीत १६०० अंशांच्या घसरणीचा ऐतिहासिक नीचांक नोंदला गेला. चीनी अर्थव्यवस्थेचे आकारमान आणि जागतिक बाजारातील वावर या पार्श्वभूमीवर ही घसरण किती काळासाठी होणार असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, विक्रमी घसरणीच्या दुसऱ्या आणि आज, चौथ्या दिवशी बाजार सावरल्याने ‘युआन’चा इफेक्ट आटोक्यात येत असल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केलेले आहे.सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर चीनने युआनच्या मूल्यात २ टक्के अवमूल्यन केल्याचा मोठा परिणाम झाला होता. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक हे मजबूक असून या घटनेचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही व बाजार सावरेल असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज बाजारावर परिणाम दिसून आला.त्याचाच परिणाम अथवा संकेत हे बाजार सावरल्याच्या रुपाने दिसून येत आहे. सोमवारी आणि बुधवार मिळून बाजारात अंदाजे १९०० अंकांनी घसरण झाली होती. मात्र, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी मिळून सेन्सेक्समध्ये सुमारे ९०० अंकांचा सुधार दिसून आला आहे. (प्रतिनिधी)