मुंबई : आधुनिक औषधशास्त्र म्हणून ओळख असलेल्या अॅलोपथीमध्ये आजच्या तरुणांना नोकरी नकोय. अॅलोपथीपेक्षा आयुष क्षेत्राने तरुणांवर भुरळ घातली आहे. दिवसेंदिवस आयुष कंपन्यांचे आक्रमक मार्केटिंग व लोकांचा त्यांच्या उत्पादनाकडे असलेला ओढा यामुळे त्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. परिणामी या क्षेत्रातील रोजगार वाढत असून, त्यामुळेच तेथे ओढा वाटत असावा.इंडीड इंडियाने केलेल्या देशातील पहिल्या ‘जॉब सर्च’ अहवालाचे हे निष्कर्ष आहेत. अॅलोपथीअंतर्गत असलेल्या फार्मा क्षेत्रातील जॉब सर्चमध्ये वर्षभरात ४० टक्के घट झाली आहे. याउलट आयुष (आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमीओपथी) क्षेत्रातील जॉब सर्च तरुणांनी अधिक केले आहे. विशेषत: पतंजली समूहाने या क्षेत्रात उडी घेतल्यापासून आयुषमधील जॉब सर्चमध्ये ५६ टक्के वाढ झाल्याचे या अहवालातून बाहेर आले आहे.मुख्य म्हणजे, जॉब सर्चमधील पहिल्या पाच क्षेत्रांतही अॅलोपथी फार्माचा समावेश नाही. नोटाबंदीनंतरचा डिजिटल बँकिंगचा सपाटा, डिजिटल इंडिया उपक्रम आदींमुळे तंत्रज्ञानाचा उपयोग झपाट्याने वाढत आहे. आजचे तंत्रज्ञान हे पूर्णपणे ‘आयओटी’वर (इंटरनेट आॅफ थिंग्स) आधारलेले असताना या क्षेत्रातील जॉब सर्चही ९८ टक्क्यांनी वाढला आहे. डिजिटल मार्केटिंगचा शोध ८० टक्के आहे. सर्वत्र खासगीकरण, कॉर्पोरेट जगताचा बोलबाला असला तरी सरकारी नोकºयांकडील तरुणाईचा कल कायम आहे. या क्षेत्रातील जॉब सर्च ६० टक्क्यांनी वाढले आहे.देशातील सामाजिक-आर्थिक कल काय आहे? आणि समाजमन कुठल्या दिशेने आहे, हे देशातील तरुण कशा प्रकारच्या नोकºयांचा शोध घेतात, यावरून लक्षात येते. त्यात या सर्वेक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत इंडीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सशी कुमार यांनी व्यक्त केले.आरामाची नोकरी हवी सर्वांनाच!-घरबसल्या आरामाच्या नोकरीची इच्छा प्रत्येकाची असते. मात्र बहुतांश वेळा ते अशक्यच असते. यासाठीच ‘वर्क फ्रॉम होम’ प्रकारच्या नोकरीचा नवा ट्रेंड सध्या आला आहे. या श्रेणीतील जॉब सर्च तब्बल १११ टक्क्यांनी वाढले आहेत.
तरुणांना नको अॅलोपथीची नोकरी, मागणीत मोठी घट :आरामाची नोकरी हवी सर्वांनाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:54 IST