Join us  

चेहराच ठरेल तुमची ओळख, ओळखपत्राशिवाय मिळणार विमानतळात प्रवेश ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 7:18 AM

बंगळुरू : फेब्रुवारीपासून कार्यान्वित होणार बायोमेट्रिक यंत्रणा

नवी दिल्ली : देशात पुढील वर्षी फेब्रुवारीपासून हवाई प्रवासासाठी ओळखपत्र, आधार कार्ड किंवा बोर्डिंग पास यापैकी काहीही जवळ बाळगण्याची गरज कदाचित उरणार नाही. प्रवाशाची चेहºयावरून डिजिटल तंत्राद्वारे ओळख पटवून त्याला विमानतळाच्या आत प्रवेश देण्यात येईल. ही बायोमेट्रिक सुविधा देशभरातील पुण्यासह सर्व महत्त्वाच्या विमानतळांवर बसविण्याच्या डीजी यात्रा या प्रकल्पाच्या कामास गुरुवारी नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

यासंदर्भात प्रभू यांनी सांगितले की, प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी ज्या पद्धती वापरण्यात येतात त्याला पूरक म्हणून फेशिअल रेकग्निशन बायोमेट्रिक यंत्रणा वापरण्यात येईल. हीच पद्धती वापरायला हवी, अशी सक्ती कोणावरही करण्यात येणार नाही. मात्र, ज्या विमान प्रवाशांना तिचा उपयोग करावासा वाटेल त्यांना ती सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. देशातील बंगळुरू व हैदराबाद येथील विमानतळांवर सर्वांत प्रथम ही यंत्रणा येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत कार्यान्वित होईल. त्यानंतर पुणे, कोलकाता, वाराणसी, विजयवाडा येथील विमानतळांवर ही यंत्रणा बसविण्यात येईल व टप्प्याटप्प्याने देशभर तिचा विस्तार केला जाईल. फेशिअल रेकग्निशन बायोमेट्रिक यंत्रणेत एखाद्या व्यक्तीची नोंद झाल्यानंतर ती माहिती केंद्रीय कक्षामध्ये साठविली जाईल. ही व्यक्ती विमानाचे तिकीट जेव्हा काढेल त्यावेळी तिला युनिक आयडी दिला जाईल. आपले नाव, मोबाईल क्रमांक, आधारसहित अन्य ओळखपत्राची माहिती देऊन ही व्यक्ती तो आयडी मिळवू शकेल. प्रवासाआधी त्या व्यक्तीची माहिती विमान कंपनी विमानतळ अधिकाºयांना कळवेल.सेवेचा होणार विस्तारच्फेशिअल रेकग्निशन बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्यासाठी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने लिस्बन येथील व्हिजन बॉक्स या कंपनीशी या महिन्याच्या प्रारंभी एक करार केला.च्या यंत्रणेचा पहिला टप्पा सदर विमानतळावर फेब्रुवारी महिन्यापासून कार्यान्वित होईल व त्याचा लाभ सर्वप्रथम जेट, एअर एशिया, स्पाईसजेट या विमान कंपन्यांचे प्रवासी घेतील व कालांतराने या सेवेचा विस्तार होईल.

टॅग्स :विमानतळबेंगळूर