Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फार काळ कायदा मोडू शकत नाही!

By admin | Updated: September 9, 2016 04:54 IST

रिलायन्स जिओच्या ४-जी सेवेचे उद्घाटन करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘अन्य कंपन्यांनी अंतर्गत जोडण्या न दिल्यामुळे आपल्या कंपनीचे ५ कोटी कॉल अवघ्या एका आठवड्यात फेल

मुंबई : रिलायन्स जिओच्या ४-जी सेवेचे उद्घाटन करताना कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘अन्य कंपन्यांनी अंतर्गत जोडण्या न दिल्यामुळे आपल्या कंपनीचे ५ कोटी कॉल अवघ्या एका आठवड्यात फेल झाले’ असा आरोप केला होता. आता एका मुलाखतीत अंबानी यांनी ही समस्या काही आठवड्यांत सुटेल, असे म्हटले आहे. तुम्ही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ कायदा मोडू शकत नाही, असा इशाराच अंबानी यांनी अन्य कंपन्यांना दिला आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अंबानी म्हणाले की, सर्व दूरसंचार कंपन्यांना अंतर्गत जोडण्या देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. तुमच्या परवान्यातच हे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी नेहमीसाठी अंतर्गत जोडण्या नाकारू शकणार नाही. कोणताच कायदा तुम्ही फारकाळ मोडू शकत नाही. तुम्ही फार वजनदार आसामी असाल, तर एक दोन वेळा फार तर काही आठवडे तुम्हाला वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल मोकळीक दिली जाऊ शकेल; पण तुम्ही सतत वाहतूक सिग्नल तोडून जाऊ लागलात, तर मात्र कायदा आपले काम करील. आमच्या मतानुसार, एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन कोणीच कायदा मोडू शकत नाही. रिलायन्स जिओच्या कॉलसाठी अन्य कंपन्यांना जोडण्या द्याव्याच लागतील. अंबानी म्हणाले की, जिओ ही जगातील सर्वांत मोठी स्टार्टअप कंपनी आहे. एकाही डॉलरचा महसूल नसताना १.५ लाख कोटींची गुंतवणूक कोणत्याही स्टार्टअप कंपनीने आतापर्यंत केलेली नाही. कंपनीला नफा केव्हा होईल, या प्रश्नाच्या उत्तरावर अंबानी म्हणाले की, आम्हाला राक्षसी परताव्याची अपेक्षा नाही. तथापि, ही कंपनी आम्हाला पुरेसा आणि मजबूत परतावा देईल.