Join us

LPG गॅस कनेक्शनसाठी आता एजन्सीच्या चकरा माराव्या लागणार नाहीत; एका मिस्ड कॉलवर होणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:45 IST

LPG Gas Cylinder : एलपीजी गॅस कनेक्शनसाठी आता एजन्सीच्या चकरा मारण्याची गरज नाही. मिस्ड कॉलद्वारेच होणार सर्व काम.

ठळक मुद्देएलपीजी गॅस कनेक्शनसाठी आता एजन्सीच्या चकरा मारण्याची गरज नाही. मिस्ड कॉलद्वारेच होणार सर्व काम

जर तुम्हाला नवं LPG कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला आता एजन्सीच्या चकरा मारण्याची गरज नाही. एका मिस्ड कॉलद्वारे तुमचं काम पूर्ण होणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडनं ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. पाहूया तुम्ही या योजनेता कसा फायदा घेऊ शकाल. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे देण्यात आलेल्या महितीनुसार आता कोणत्याही व्यक्तीनं 8454955555 या मिस्ड कॉल दिल्या कंपनी त्यांना संपर्क करे, त्यानंतर पत्त्याचा पुरावा आणि आधार कार्डाद्वारे तुम्हाला गॅस कनेक्शन दिलं जाईल. याच क्रमांकाद्वारे ग्राहकांना आता आपला गॅस सिलिंडर रिफिलदेखील करता येणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागेल. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीकडे गॅस कनेक्शन असेल तर त्याच पत्त्यावर तुम्हीदेखील कनेक्शन घेऊ सकता. परंतु याच्यासाठी तुम्हाला एजन्सीकडे जावं लागेल. तसंच जुनी कागदपत्रे दाखवून तुम्हाला तुमचा पत्ता व्हेरिफाय करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याच पत्त्यावर गॅस कनेक्शन दिलं जाईल.

टॅग्स :गॅस सिलेंडरव्यवसाय