Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘देशात १५० ठिकाणी योगपार्क सुरू करणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 04:48 IST

देशात ५० ठिकाणी योगपार्क कार्यान्वित झाले आहेत

पणजी : देशात ५० ठिकाणी योगपार्क कार्यान्वित झाले आहेत. पुढील आणखी १५० योगपार्क सुरू केले जातील, असे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी येथे सांगितले.नाईक म्हणाले, की २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे. यापूर्वी दिल्ली, लखनौ आदी ठिकाणी योगदिनाचे मुख्य सोहळे झाले आहेत. चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य सोहळा डेहरादूनला होईल. त्याच दिवशी गोव्यातील बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात योगाचा कार्यक्रम होईल.