संकेत सातोपे, मुंबईलहरी पाऊस, अवर्षण-अतिवर्षण, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आदी अनेक कारणांमुळे राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पन्नात गेल्या वर्षात घट झाल्याचे दिसते. गहू, ज्वारी, बाजरी, ऊस आणि भुईमूग या चार पिकांमध्ये ही घट प्रामुख्याने दिसून येते. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.२०१३-१४ या आर्थिक वर्षात गव्हाचे उत्पादन १६०२ हजार टन, ज्वारी २,४८२, बाजरी ७८८, ऊस ७६,९०१ आणि भुईमूग ३९३ हजार टन इतके झाले आहे; मात्र २०१०-११ मध्ये हेच उत्पादन गहू २,३०१, बाजरी ७८८, ऊस ८५,६९१ आणि भुईमूग ३९३ हजार टन इतके झाले होते. याचाच अर्थ २०११ च्या तुलनेत यंदा गहू, ज्वारी, बाजरी, ऊस आणि भुईमुगाचे उत्पादन अनुक्रमे ६९९, ९७०, ३३५, ८७९०, ७७ हजार टन इतके घटले आहे.विशेष म्हणजे याच कालावधीत तांदूळ, कडधान्ये आणि कापूस या तीन पिकांच्या उत्पादनात याच कालावधीत वाढ झाली आहे. तांदळाचे उत्पादन २,६९१ हजार टनांवरून वाढून ३,१२० हजार टन झाले आहे, तसेच कडधान्यांचे उत्पादन ३,०९६ वरून ३,१७० आणि कापसाचे उत्पादन ७,४७३ वरून ८,८३४ हजार टन इतके वाढले आहे. (प्रतिनिधी)
राज्यातील ऊस-भुईमुगाचे उत्पन्न घटले
By admin | Updated: April 6, 2015 02:45 IST