लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) कमी व्याज मिळण्याची शक्यता आहे. श्रम मंत्रालयाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात ८.६५ टक्के व्याज सदस्यांना दिले होते. त्यात यंदा २५ आधार अंकांची कपात होऊ शकते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. भांडवली बाजारातून रोखे आणि मुदत ठेवींवर मिळणाऱ्या परताव्यात घट झाल्याने ईपीएफओकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते. सरकारी रोख्यातील गुंतवणुकीवरील व्याजदर ७.४१ टक्क्यांवरून ६.५६ टक्क्यांवर आला आहे. इतरही गुंतवणुकीवरील व्याजदरात घट झाली आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा ईपीएफवर मिळणार कमी व्याज
By admin | Updated: July 7, 2017 00:55 IST