Join us

यंदा गव्हाचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटणार

By admin | Updated: March 31, 2015 01:20 IST

अवकाळी पावसामुळे यावर्षी गव्हाचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटू शकते. २०१३-१४ वर्षात गव्हाचे उत्पादन विक्रमी ९ कोटी ५८.५ लाख टन झाले होते.

नवी दिल्ली/चंदीगड : अवकाळी पावसामुळे यावर्षी गव्हाचे उत्पादन दोन टक्क्यांनी घटू शकते. २०१३-१४ वर्षात गव्हाचे उत्पादन विक्रमी ९ कोटी ५८.५ लाख टन झाले होते. त्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी घट होईल, असे सरकारी संशोधन संस्थेने सोमवारी म्हटले.नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पंजाबात गव्हाची कापणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे गहू जमिनीवर पडल्यामुळे गव्हाच्या दर्जावरही परिणाम होण्याचा धोका आहे. भारतीय गहू संशोधन संस्थेच्या संचालक इंदू शर्मा यांनी सांगितले की, पावसासोबतचे वेगवान वारे या स्थितीत गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान करू शकतात. गेल्या २४ तासांत अंबालात २.१, हिसार ६.८, कर्नाल ५.८, भिवानी १६, अमृतसर ३.६, लुधियाना ७.१, पटियाला ६, गुरुदासपूर ८.१, मन्सा ५.३ मिलिमीटरसह पंजाब व हरियाणातील अनेक भागात पाऊस झाला आहे. हरियाणाची ५०० कोटींची मागणीअवकाळी व गारांच्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने केंद्र सरकारसाठी खरेदीचे लक्ष्य १३ टक्क्यांनी घटवून येत्या रबी हंगामासाठी ६५ लाख टन केले आहे. २०१५-१६ साठीच्या रबी हंगामाचे खरेदीचे लक्ष्य ७५ लाख टनांवरून ६५ लाख टन करण्यात आले आहे. गारांच्या पावसामुळे हरियाणात १८ लाख हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. सरकारने केंद्राकडे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी ५०० कोटी रुपये मागितले आहेत.