Join us  

यंदा वर्तमानपत्रांमधील जाहिरातींचे प्रमाण वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 1:19 AM

newspapers : ‘ग्रुपएम’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘धिस इयर, नेक्स्ट इयर’ (टीएनवायएन), २०२१ या अहवालात यंदाच्या वर्षात भारतामध्ये प्रसारमाध्यमांच्या जाहिरातींवरील खर्चात वाढ होईल, असे स्पष्ट केले आहे.

मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे प्रसारमाध्यमांमधील जाहिरातींचा ओघ आटला होता. मात्र, यंदाच्या वर्षात ही सर्व कसर भरून निघणार असून जाहिरातींचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकीत ‘ग्रुपएम’ या मार्केटिंग सर्व्हिस संस्थेने आपल्या पाहणी अहवालात केले आहे. त्यात वर्तमानपत्रांमधील जाहिरातींचा वाटा १२ हजार कोटी रुपयांचा असेल.‘ग्रुपएम’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘धिस इयर, नेक्स्ट इयर’ (टीएनवायएन), २०२१ या अहवालात यंदाच्या वर्षात भारतामध्ये प्रसारमाध्यमांच्या जाहिरातींवरील खर्चात वाढ होईल, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या खर्चाचे प्रमाण आक्रसले होते. २०२१ या वर्षात ८० हजार १२३ कोटी रुपये जाहिरातींवर खर्च होतील. 

- झपाट्याने विकसित होत असलेल्या सर्वोच्च दहा जागतिक बाजारपेठांत भारत दुसऱ्या क्रमांकावर- २०२१ मध्ये जाहिरातींवरील खर्चात वाढ करणारा सहावा देश ठरणार- जाहिरातींवर सर्वाधिक खर्च करणारा देश म्हणून २०१९ मध्ये भारत ९व्या क्रमांवर होता. २०२० मध्ये १०व्या स्थानावर घसरण झाली. २०२१ मध्ये पुन्हा ९व्या स्थानावर येईल, असा अंदाज आहे.

२०२० हे कोरोनावर्ष म्हणून पाहिले जाते. या वर्षात कोरोना फैलावामुळे अनेक प्रकारच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. साहजिकच सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम जाणवला. जाहिरात क्षेत्रही त्यास अपवाद ठरले नाही. मात्र, आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. जाहिरात क्षेत्रात यंदाच्या वर्षात तेजीचे वातावरण येईल. नजीकच्या काळात आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे जाहिरात क्षेत्र पुन्हा झळाळून उठेल.- प्रशांत कुमार, सीईओ, ग्रुपएम, दक्षिण आशिया. 

टॅग्स :व्यवसाय