Join us

यंदा वृद्धीदर ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त

By admin | Updated: April 15, 2016 02:05 IST

यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे भाकीत खरे ठरल्यास भारताचा सध्याचा विकास दर ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदला जाऊ शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

वॉशिंग्टन : यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे भाकीत खरे ठरल्यास भारताचा सध्याचा विकास दर ७.५ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदला जाऊ शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.गेली २ वर्षे भारतात कमी पाऊस पडत असून, जागतिक परिस्थितीही विपरीत आहे. याही स्थितीत भारताने ७.५ टक्के विकासाचा दर गाठला आहे. त्यामुळे पावसाचे भाकीत खरे ठरल्यास हा विकास दर आणखी वाढू शकतो.भारताचा सध्याचा ७.५ टक्के विकास दर देशाची एकूण गरज पाहता पुरेसा नाही आणि ‘चांगली कामगिरी’ करण्याची देशाची ‘क्षमता’ आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.