Join us

जिओची बंपर ऑफर...3 महिन्यांसाठी 100GB फ्री डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 12:29 IST

जिओ दर महिन्याला 100mbps स्पीडसोबत 100GB डाटा फ्री देणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - रिलायन्स जिओची ब्रॉडबॅण्ड सर्व्हिस जिओफायबर दिवाळीच्या आसपास लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र जिओच्या या नव्या स्कीमसंबंधीची महत्वाची माहिती अधिकृत वेबसाईटवर रिलीज होण्याआधीच लीक झाली आहे. जिओचं पेज काही काळ लाईव्ह होतं, मात्र नंतर ते हटवण्यात आलं होतं. लीक झालेल्या माहितीनुसार, जिओफायबर प्रीव्ह्यू ऑफरनुसार जिओ दर महिन्याला 100mbps स्पीडसोबत 100GB डाटा फ्री देणार आहे. तीन महिन्यांसाठी ही ऑफर असणार आहे. 
 
आणखी वाचा 
जिओची दिवाळी धमाका ऑफर; 500 रूपयात 100 जीबी ब्रॉडबँड डेटा
जिओचा नवा धमाका, 1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन
जिओ डेटा हॅक प्रकरणी एक संशयित ताब्यात
 
100GB ची लिमिट संपल्यानंतर स्पीड 1mbps इतका होईल. जिओफायबर ब्रॉडबॅण्डसाठी रिलायन्स जिओ 4500 रुपयांचं सेक्युरिटी डिपॉझिट घेऊ शकतं, जे नंतर रिफंड केलं जाईल. 
रिलायन्स जिओचा जिओफायबर 4K कॉन्टॅक्ट स्ट्रिमिंग केल. यामुळे युजर्स एकाचवेळी अनेक डिव्हाईसवर हाय-स्पीड इंटरनेट वापरु शकणार आहेत. साईटवर रजिस्ट्रेशन पेजही पाहण्यात आलं आहे ज्यामध्ये युजर्स जिओच्या जिओफायबर ब्रॉडबॅण्ड सर्व्हिससाठी रजिस्टर करु शकणार आहेत. युजर्सला आपला संपुर्ण पत्ता, शहर, पिनकोड, नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल अशी महत्वाची माहिती रजिस्ट्रेशन करताना द्यावी लागणार आहे.  
 
रिलायन्स जिओ जास्तीत जास्त शहरांमध्ये कव्हरेज करण्याच्या दृष्टीने जिओफायबर ब्रॉडबॅण्ड नेटवर्कचा विस्तार करत आहे. वेबसाईटवर लीक झालेल्या माहितीनुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, जयपूर, सूरत, वडोदरा आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये ही सेवा दिली जाईल.
याआधी इकॉनॉमिक टाईम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार जिओ 500 रुपयांत 100GB डाटा देणार असल्याचं सागंण्यात आलं होतं. मे महिन्यात रिलायन्स जिओने ट्विट करत ट्रायल बेसवर काही शहरांमध्ये सेवा देत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यांनी जास्त माहिती दिलेली नाही. 
 
1734 रुपयांत येणार जिओचा 4जी स्मार्टफोन
दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवलेली रिलायन्स जिओ कंपनी ग्राहकांसाठी धमाकेदार 4जी फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स जिओ 4G VoLTEला सपोर्ट करणारा फोन लवकरच लाँच करणार आहे. विशेष म्हणजे या 4जी फोनची किंमत इतर स्मार्टफोनपेक्षा फारच कमी आहे.
 
गॅझेट्स वेबसाइट 91 मोबाइल डॉट कॉमनुसार, या  रिलायन्स जिओ 4G VoLTE फोनची किंमत 1734 रुपये ते 1800 रुपयांपर्यंत असणार आहे. रिलायन्स जिओचा भारतातील गरिबातील गरीब ग्राहकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा मानस आहे.