Join us

हा आहे जगातील सर्वात छोटा 4 जी स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 18:02 IST

स्टायलिश लूक, मोठा स्क्रीन आणि दमदार बॅटरी असणारे स्मार्टफोन सध्या मार्केटमध्ये लोकांच्या पसंतीला उतरताना दिसतात. मात्र, या धर्तीवर चीनच्या एका कंपनीने अवघ्या 2.4 इंचाचा 4 जी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - स्टायलिश लूक, मोठा स्क्रीन आणि दमदार बॅटरी असणारे स्मार्टफोन सध्या मार्केटमध्ये लोकांच्या पसंतीला उतरताना दिसतात. मात्र, याच धर्तीवर चीनच्या एका कंपनीने अवघ्या 2.4 इंचाचा 4 जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जगातील सर्वात छोटा 4 जी असलेला स्मार्टफोन असल्याचा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. यूनीहर्ट्ज असे या कंपनीचे नाव आहे. 
यूनीहर्ट्स कंपनीने जेली या नावाने हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. जेली हा अॅन्ड्राईड स्मार्टफोन दिसयला जरी छोटा असला, तरी यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने जेली आणि जेली प्रो असे दोन स्मार्टफोन आणले आहे. दोन्हीमध्ये अॅन्ड्राईड 7.0 नॉगट असून 1.1GHz क्वॉड-कोर प्रोसेसर आहे. जेलीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे, तर जेली प्रोमध्ये 2 जीबी रॅम व 16 जीबी स्टोरेज मेमरी आहे. याचबरोबर ड्युअल सिम असलेल्या या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 4G LTE सोबत वाय-फाय, ब्लू-ट्युथ आणि जीपीएसचा सपोर्ट करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 950 mAh इतकी बॅटरी असून कंपनीकडून दावा करण्यात आला आहे की, बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर पुढील तीन दिवसांपर्यंत चार्ज करण्याची गरज नाही. 
दरम्यान, या स्मार्टफोनची किंमत पाहली, तर सर्वसामान्यांच्या बजेटमधील आहे. जेलीची 59 डॉलर (जवळपास 3,790 रुपये) आणि जेली प्रोची 75 डॉलर (जवळपास 4,815 रुपये) इतकी आहे.