Join us

कामगारांचा ‘कोल’मधील निर्गुंतवणुकीस विरोध

By admin | Updated: September 12, 2014 00:05 IST

कोल इंडियातील १० टक्के हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयास कडाडून विरोध करण्याचे अखिल भारतीय कोल वर्कर्स फेडरेशनने ठरविले आहे

कोलकाता : कोल इंडियातील १० टक्के हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयास कडाडून विरोध करण्याचे अखिल भारतीय कोल वर्कर्स फेडरेशनने ठरविले आहे. फेडरेशनचे सरचिटणीस जिबॉन रॉय यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. इंडियन नॅशनल माईन वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस एस. क्यू. झामा यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.कोल इंडियातील सरकारची १० टक्के हिस्सेदारी विकण्याचा केंद्र सरकारने बुधवारी निर्णय घेतला आहे. तीन दिवसांपूर्वीच पाच केंद्रीय कामगार संघटनांनी निर्गंुतवणुकीस विरोधासह विविध मागण्यांसाठी १८ ते २० सप्टेंबरपर्यंत नियमानुसार काम आंदोलनाची कोळसा विभागाच्या सचिवांना नोटीस दिली आहे. यात भाजपा संलग्नित बीएमएसचाही समावेश असल्याचे झामा यांनी सांगितले. या अनुषंगाने कोल इंडियाने सोमवारी दिल्लीत बैठक बोलाविली आहे. २१ सप्टेंबरला सेंट्रल कोल इंडिया युनियनची बैठक होईल. यात निर्गुंतवणुकीस विरोध करणाऱ्या ठरावासह पुढील संयुक्त कृती योजना ठरविली जाईल. (वृत्तसंस्था)