Join us  

आधार पेमेंट सिस्टीमसाठी कामगार ‘गिनीपिग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:50 AM

‘आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम’सारख्या अपरिपक्व तंत्रज्ञानासाठी मनरेगा कामगार फुकटचे ‘गिनीपिग’ (प्रयोगशाळेतील प्राणी) बनले आहेत, असा आरोप अर्थतज्ज्ञ व ग्रामीण रोजगार हमी योजनेचे शिल्पकार जीन ड्रेझ यांनी केला आहे.

नवी दिल्ली : ‘आधार पेमेंट ब्रिज सिस्टीम’सारख्या अपरिपक्व तंत्रज्ञानासाठी मनरेगा कामगार फुकटचे ‘गिनीपिग’ (प्रयोगशाळेतील प्राणी) बनले आहेत, असा आरोप अर्थतज्ज्ञ व ग्रामीण रोजगार हमी योजनेचे शिल्पकार जीन ड्रेझ यांनी केला आहे.ड्रेझ यांनी सांगितले, आधार पेमेंट ब्रिज सिस्टीमपूर्वी उशिराने पेमेंट होण्याची प्रमुख समस्या होती. ही सिस्टीम आल्यानंतर इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पेमेंट अमान्य होणे (रिजेक्टेड पेमेंट), अन्यत्र जाणे (डायव्हर्टेड पेमेंट) आणि पेमेंट गोठणे (लॉक्ड पेमेंट) यांचा त्यात समावेश आहे.जीन ड्रेझ हे बेल्जियममध्ये जन्मलेले भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यासोबत ‘अ‍ॅन अनसर्टन ग्लोरी : इंडिया अ‍ॅण्ड इटस् कॉन्ट्रॅडिक्शन’ नावाच्या ग्रंथाचे सहलेखन केले आहे. मनरेगा योजनेचा पहिला दस्तावेज त्यांनीच तयार केला होता. संपुआ-१ आणि संपुआ-२ सरकारांच्या काळात ते राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते.थेट लाभ हस्तांतरणातील दोष त्यांनी या वेळी पटवून दिले. उदा. सध्या प्रत्येक व्यक्तीची अनेक खाती असतात. अशा स्थितीत सर्वांत शेवटी आधार जोडणी झालेल्या खात्यात तुमची सबसिडी, मजुरी अथवा पेन्शन जमा होते. मग हे पैसे शोधणे सामान्य माणसाला कठीण होते. काही वेळा तर तुम्हाला अजिबात माहीत नसलेल्या एअरटेल वॉलेटसारख्या तिसऱ्याच खात्यात पैसे जाऊन पडतात. कधी-कधी पैसे बंदिस्त होतात. तुम्हाला ते काढताच येत नाहीत.>थेट लाभ हस्तांतरण कठीणजीन ड्रेझ म्हणाले, आधारमुळे थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत पारदर्शकता आली, असे म्हणणे हाच विपर्यास आहे. उलट यामुळे सामान्य माणसासाठीथेट लाभ हस्तांतरण अधिक अवघड केले आहे.

टॅग्स :पैसा