Join us

एसबीआयची प्रत्येक जिल्ह्यात महिला शाखा

By admin | Updated: March 8, 2016 21:33 IST

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबत महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई : महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासोबत महिलांनी बँकिंग सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा म्हणून स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) प्रत्येक जिल्ह्यात बँकेची महिला शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनीसांगितले.एसबीआयने विभागवार आधीच १४ शाखा सुरु केल्या आहेत. महिलांना कामकाज करणे सोयीचे होईल, अशा पद्धतीने या सर्व बँकात व्यवस्था असेल. महिलांसाठी कामकाजासाठीच्या दृष्टीने सुरक्षित आणि योग्य वातावरण निर्माण करण्याबाबत आम्ही दक्ष आहोत.