Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उद्योग सुरू करावेत

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST


फोटो आहे... रॅपमध्ये ....

- व्हीआयएच्या महिला विंगचा उपक्रम : उद्योगांना भेट

नागपूर : महिलांनी स्वयंस्फूर्तीने उद्योग सुरू करून राष्ट्रीय क्षेत्रात विविध क्षेत्रात नाम कमवावे, या उद्देशाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगने नागपुरातील नामांकित उद्योगांना अलीकडेच भेट दिली आणि तेथील उद्योग प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.
महिला विंगच्या अध्यक्षा वंदना शर्मा यांच्या नेतृत्वात जवळपास ४४ महिला उद्योजिका आणि महिलांनी हल्दीराम फूड इंटरनॅशनल लिमिटेड आणि सुरूची मसाले यांच्या कापसी येथील कारखान्यांना भेट दिली. या कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, मार्केटिंग, आधुनिक मशीन्स आणि व्यवस्थापनाची माहिती महिलांना देण्यात आली. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थापनाने उत्तरे दिली. भव्य मशीन्सची देखरेख, शुद्धता, पॅकेजिंग प्रक्रिया आदींसाठी काटेकोरपणा पाळला जात असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. कंपन्यांनी आपआपल्या उत्पादनांचे गिफ्ट हॅम्पर्स महिलांना भेटस्वरूपात दिली.
व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा वंदना शर्मा यांच्या नेतृत्वात भेट दिलेल्या महिलांमध्ये सचिव साची मलिक, उपाध्यक्षा रीता लांजेवार व मनीषा बावनकर, कोषाध्यक्षा पूनम लल्ला, पीआरओ शिखा खरे, माजी अध्यक्षा अनिता राव, सरिता पवार आदींसह ४४ महिलांचा समावेश होता.