Join us  

पेन्शन खात्यातून पैसे काढणे झाले सोपे, अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 9:12 AM

pension account : पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (पीएफआरडीए) यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन सेवा (एनपीएस) योजनेच्या सभासदांसाठी पेनी ड्रॉप नावाची नवीन सुविधा सादर केली आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (पीएफआरडीए) यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन सेवा (एनपीएस) योजनेच्या सभासदांसाठी पेनी ड्रॉप नावाची नवीन सुविधा सादर केली आहे. या सुविधेमुळे पेन्शन योजनेच्या सदस्यांना त्यांच्या खात्यातील पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे.    ‘एनपीएस’मधून पैसे काढतेवेळी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद जेव्हा पैसे काढण्यासाठी अर्ज करतात तेव्हा पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो. मात्र अनेकदा असा अनुभव आला आहे की, सभासदांकडून चुकीचा तपशील दिला जातो.   जसे की चुकीचा खाते क्रमांक, आयएफएससी चुकीचा असणे, नावात खाडाखोड, खाते गोठवले जाणे, खात्यात कोणतेही व्यवहार होत नसणे. या गोष्टींमुळे सभासदांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास विलंब लागतो. पेनी ड्रॉप सुविधा काय आहे?पेनी ड्रॉप सुविधेमुळे एनपीएस सभासदांचे बँक तपशील सहजपणे पडताळून पाहता येतात. संबंधित सभासदाचे बँक खाते सक्रिय आहे किंवा कसे, याचा लगेचच उलगडा होतो.पेनी ड्रॉप सुविधा कसे काम करते? पेन्शन योजनेच्या सभासदाने पैसे काढण्यासाठी अर्ज केल्यानंतरच पेनी ड्रॉप सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीकडील (सीआरए) रेकॉर्डवरून ही पडताळणी केली जाईल.  सीआरए पेनी ड्रॉपच्या माध्यमातून संबंधिताचे बँक तपशील आणि ते सक्रिय आहे की नाही, याचा तपास करेल. परमनन्ट रिटायरमेंट अकाऊंट नंबरच्या साह्याने सभासदाच्या नावासह अन्य तपशिलांची सत्यता तपासून घेतली जाईल. सभासदाच्या बँक तपशिलाची खात्री पटली की पेन्शन योजनेचे पैसे त्याच्या खात्यात जमा होण्यास विलंब होणार नाही.पेनी ड्रॉप सुविधेचे शुल्क किती?‘पीएफआरडीए’च्या परिपत्रकानुसार पेनी ड्रॉप सुविधा शुल्क कमी आहे. के फिन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्याकडून या सुविधेसाठी १ रुपया ९० पैसे करआकारणी केली जाते. एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्याकडून २ रुपये ४० पैसे कर आकारला जातो. 

टॅग्स :व्यवसायनिवृत्ती वेतन