Join us
Daily Top 2Weekly Top 5

केबीसीवर हिवाळी अधिवेशात निर्णय

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : प़बंगाल धर्तीवर गुंतवणूकदारांना रक्कम देण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : प़बंगाल धर्तीवर गुंतवणूकदारांना रक्कम देण्याची मागणी
नाशिक : राज्यातील कौन बनेगा करोडपती (केबीसी) घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, हिवाळी अधिवेशनादरम्यान हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी शुक्रवारी दिली़
केबीसी घोटाळ्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना गुरुवारी देण्यात आल़े यावेळी त्यांनी अधिवेशनादरम्यान निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे गायकर म्हणाल़े निवेदनात म्हटले आहे की, केबीसीची व्याप्ती मोठी असून, यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांना अद्याप अटक केलेली नाही़ तसेच शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय न झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत, तर सहा ठेवीदारांनी आत्महत्त्या केल्या आहेत़ याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा झाली असून, त्यांनी केबीसीची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही़ पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ठेवीदारांना त्वरित रक्कम देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आह़े (प्रतिनिधी)