Join us
Daily Top 2Weekly Top 5

होली फ्लॉवर हायस्कूल मध्ये विन्टर कार्नीवल

By admin | Updated: December 25, 2015 02:57 IST

नाशिकरोड : श्रीरामनगर जुना सायखेडारोड जेलरोड येथील जय गुरूदेव एज्युकेशनल ॲन्ड वेल्फेअर ट्रस्ट संचलित होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल मध्ये विन्टर कार्नीवल २०१५ अतिशय साजरा करण्यात आला.

नाशिकरोड : श्रीरामनगर जुना सायखेडारोड जेलरोड येथील जय गुरूदेव एज्युकेशनल ॲन्ड वेल्फेअर ट्रस्ट संचलित होली फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल मध्ये विन्टर कार्नीवल २०१५ अतिशय साजरा करण्यात आला.
कार्नीवलची सुरूवात इकिबाना, अंताक्षरी, फॅन्सी ड्रेस यासारख्या स्पर्धेने करण्यात आली. तसेच जाहिरात दिवस, आई-वडिल आभार दिवस, एक मिनीट शो, मिस मॅच डे, चौपाटी डे, डिस्नी कॅरेक्टर, वेशभुषा स्पर्धांमध्ये व डेज मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात नृत्य, गायन, फॅन्सी ड्रेस यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजची वेशभुषा घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली. मुलांना सर्वधर्म समभावाची शिकवण देण्यात आली. संस्थेचे सुदीप देब, विभागप्रमुख सुपर्णा देब, मुख्याध्यापिका श्रीती तालुकदार, गीता एस. तसेच शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.