Join us

मायक्रोसॉफ्टवरून ‘विन्डोज-७’चेही लॉग आऊट

By admin | Updated: January 19, 2015 02:22 IST

मायक्रोसॉफ्टने १३ जानेवारी २०१५ पासून विंडोज-७ या आॅपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट बंद केला आहे. मागील वर्षी वर्षी

अनिल भापकर, औरंगाबादमायक्रोसॉफ्टने १३ जानेवारी २०१५ पासून विंडोज-७ या आॅपरेटिंग सिस्टीमचा सपोर्ट बंद केला आहे. मागील वर्षी वर्षी मायक्रोसॉफ्टने विंडोज-एक्सपी या आॅपरेटिंग सिस्टिमचा वाढीव सपोर्ट ८ एप्रिल २०१४ रोजी बंद केला होता. खरे तर विंडोज-एक्सपीचा मुख्य सपोर्ट २००९ मध्येच मायक्रोसॉफ्टने बंद केला होता. त्याचप्रमाणे विंडोज-७ चा मुख्य सपोर्ट जरी १३ जानेवारी २०१५ रोजी बंद झाला असला तरी विंडोज-७ चा वाढीव सपोर्ट १४ जानेवारी २०२० पर्यंत मायक्रोसॉफ्टकडून ग्राहकांना मिळत राहील.मायक्रोसॉफ्टने विंडोज-७ ही आॅपरेटिंग सिस्टिमप २००९ मध्ये ग्राहकांच्या सेवेत आणली होती. सद्य:स्थितीत विंडोज-७ या आॅपरेटिंग सिस्टिमचा वाटा हा पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. मायक्रोसॉफ्टच्या तत्त्वानुसार त्यांच्या आॅपरेटिंग सिस्टिमचा मुख्य सपोर्ट हा फक्त पहिल्या पाच वर्षांसाठी असतो. त्यानुसार २००९ च्या शेवटी आलेल्या विंडोज-७ चा मुख्य सपोर्ट त्यांनी जानेवारी १५ च्या सुरुवातीला काढून घेतला. त्यांच्या तत्त्वानुसारच विंडोज-७ चा वाढीव सपोर्ट आणखी पाच वर्षे ग्राहकांना मिळणार आहे; म्हणजेच वाढीव सपोर्ट १४ जानेवारी २०२० पर्यंत असेल.मुख्य सपोर्ट म्हणजे काय?एखादी आॅपरेटिंग सिस्टिम बाजारात आल्यानंतर पहिली पाच वर्षे मायक्रोसॉफ्ट संपूर्ण सपोर्ट ग्राहकांना देते. जसे की, टेलिफोनिक सपोर्ट, नवीन फीचर्स, त्याचप्रमाणे रेग्युलर सिक्युरिटी अपडेटस् आदी. यालाच मुख्य सपोर्ट अर्थात मेनस्ट्रीम सपोर्ट म्हटले जाते. विंडोज-७ चा मुख्य सपोर्ट बंद झाला म्हणजे यापुढे विंडोज-७ च्या कुठल्याही समस्येसाठी तुम्ही मायक्रोसॉफ्ट कॉल करू शकत नाही, तसेच कुठलेही नवीन फीचर्स विंडोज-७ साठी आता मायक्रोसॉफ्टकडून उपलब्ध करून दिले जाणार नाही.