Join us

पवनऊर्जेच्या दरात मोठी घसरण

By admin | Updated: February 25, 2017 00:48 IST

१ हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाच्या लिलावात पवन ऊर्जा क्षेत्रातील वीजेचा दर विक्रमी प्रमाणात घसरून प्रति युनिट ३.४६ रुपये झाला आहे.

नवी दिल्ली : १ हजार मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाच्या लिलावात पवन ऊर्जा क्षेत्रातील वीजेचा दर विक्रमी प्रमाणात घसरून प्रति युनिट ३.४६ रुपये झाला आहे. रेवा सोलार पार्कमधील सौर वीजेचा दर २.९७ रुपये प्रति युनिट झाला आहे. या सार्वकालिक कमी दर ठरला आहे. त्यापाठोपाठ आता पवन ऊर्जेच्या दरातही विक्रमी घसरण झाली आहे. देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी हा शुभशकून मानला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, मित्राह एनर्जी, ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी, आयनॉक्स विंड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस, ओस्ट्रो कछ विंड आणि अदानी ग्रीन एनर्जी या पाच कंपन्यांनी १ हजार मेगावॅटच्या ब्लॉकसाठी ३.४६ रुपये प्रति युनिट दराच्या निविदा भरल्या आहेत.