Join us

घरं, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात करदात्यांना दिलासा मिळेल का?

By admin | Updated: February 24, 2016 18:09 IST

सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली करतिल अशी आशा आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली करतिल अशी आशा आहे. त्यामध्ये घरं, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये करदात्यांना लाभ होईल अशा तरतुदींची अपेक्षा आहे. तसेच बचत आणि गुंतवणुकीला चालना देणा-या उपायांचीही अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे कॉर्पोरेट टॅक्स रेट कमी करून 25 टक्क्यांवर आणण्याचे जुने आश्वासन जेटली निभावतील अशीही अपेक्षा आहे. टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स किंवा टीडिएस चे दरही कमी होण्याची आणि त्याच्या मर्यादांची फेररचना करण्यात येण्याची अपेक्षा आहे. जस्टिस इश्वर कमिटीने याबाबत विविध सूचना केल्या असून त्यांची अमलबजावणी झाली तर ही प्रणाली सोपी व सुटसुटीत होईल अशी आशा आहे. 
करदात्यांना सोपी आणि सुटसुटीत कार्यप्रणाली असलेली करयंत्रणा असेल तर अशा घोषणा अर्थखात्याने गेल्या चार महिन्यांमध्ये वारंवार केल्या आहेत, त्या कागदावर उतरतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये असेसमेंटची स्क्रुटिनी पटकन होणे, कराचा परतावा लवकर मिळणे आदींचा समावेश आहे.