Join us

सीम आधारशी संलग्न होणार

By admin | Updated: October 28, 2014 01:36 IST

आधार कार्डाशी मोबाइल सीमकार्ड संलग्न करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सूचना केली असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.

नवी दिल्ली : आधार कार्डाशी मोबाइल सीमकार्ड संलग्न करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सूचना केली असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. यासंदर्भात आम्ही विचार करीत आहोत. अशा त:हेने सीमकार्ड आधारशी संलग्न करण्यात यश येईल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव आर. एस. शर्मा यांनी सांगितले. माहितीची अधिकृतता तपासण्यासाठी मोबाइल हा महत्त्वाचा घटक ठरावा यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढविण्याच्या हेतूने आम्ही नुकतीच द. कोरियाला भेट दिली. सरकारने या क्षेत्रतील उद्योजकांसाठी कररूपाने, तसेच गुंतवणुकीसाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर आम्ही कोरियातील मोठय़ा उद्योजकांशी चर्चा केली, असे ते म्हणाले. कोरियात एलजी आणि सॅमसंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांबरोबरच अन्य उद्योजकांशी चर्चा करून देशातील मोठय़ा बाजारपेठेसाठी नव्हे, तर निर्यात करण्याच्या दृष्टीनेही भारतात उत्पादन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केल्याचे शर्मा यांनी सांगितले.