मुंबई : नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक मंडळात किमान एका महिलेची नियुक्ती करण्यासाठीची मुदत संपत येत असताना या कंपन्यांच्या संचालकांच्या पत्नी आणि मुलींनाच संचालक मंडळात घेण्यात आले आहे.बहुतेक कंपन्यांच्या संचालक मंडळात आलेल्या महिला या एक तर कंपनीचे प्रवर्तक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांपैकीच आहेत. काही कंपन्यांनी आपल्या स्वतंत्र संचालकाच्या जागेवर आपल्या कुटुंबातील महिलेची (पत्नी, मुलगी) नियुक्ती केली आहे. सेबीने नोंदणीकृत कंपन्यांना १ एप्रिलच्या आधी संचालक मंडळात किमान एका महिलेची नियुक्ती करण्यास सांगितले होते. या नियमाचे पालन म्हणून २०० कंपन्यांनी सोमवारी महिला संचालकाच्या नियुक्तीची घोषणा केली.
नियम पूर्ततेसाठी पत्नी, मुली बनल्या संचालक
By admin | Updated: April 1, 2015 01:48 IST