Join us  

करपात्र नसणाऱ्यांनीही का भरावे रिटर्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:54 AM

आयटीआर भरण्याचे बंधन नसलेले नागरिकही आयटीआर दाखल करू शकतात. त्याचे काही फायदे आहेत. यातील पाच फायदे जाणून घ्या.

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२०-२१ चे (आढावा वर्ष २०२१-२२) प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ असून, ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तसेच २.५ लाख रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना आयटीआर दाखल करण्यापासून सूट देण्यात आली आहे. ६० ते ८० या वयोगटासाठी सूट मर्यादा ३ लाख, तर ८० वरील नागरिकांसाठी ५ लाख आहे. असे असले तरी आयटीआर भरण्याचे बंधन नसलेले नागरिकही आयटीआर दाखल करू शकतात. त्याचे काही फायदे आहेत. यातील पाच फायदे जाणून घ्या.

- बँका अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावा.

- आयटीआर हे तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही ग्राह्य धरले जाते. 

- व्हिसा देण्यासाठी अनेक देश आयटीआर मागतात.

- मुदत ठेवीसांरख्या बचत साधनांवर लागलेल्या प्राप्तिकराचा परतावा आयटीआरमुळे तुम्हाला मिळू शकतो. इतरही कर देयता त्यामुळे कमी होते.

- व्यवसायात तोटा झाल्यास त्याचा दावा करण्यास आयटीआर उपयुक्त ठरते. तोटा ‘कॅरी फारवर्ड’ करून भांडवली लाभातून सवलत मिळविण्यासाठी आयटीआर दाखल केलेले असणे आवश्यक आहे. 

टॅग्स :इन्कम टॅक्स